Ad will apear here
Next
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान!


कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!

... आणि ही कला आणि तंत्रज्ञान कधीचे? तर तिसऱ्या शतकातले - १८०० वर्षांपूर्वीचे!!! (तिसऱ्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिराचा विस्तार चौदाव्या शतकापर्यंत चालू होता!) 

ही साखळी हातांनी कोरून बनवली, की लेझरसारख्या कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली, की दगड वितळवून बनवली, ह्यांसारख्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे आज मिळत नाहीत. अत्यंत स्टेट ऑफ द आर्ट म्हणता येईल, असे विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला अवगत असणाऱ्या प्राचीन भारतीय कलातंत्रज्ञांना शतशः नमन! 🏼

फक्त भारतातच सातच काय, ७०० अद्भुत जागतिक आश्चर्ये आहेत; पण प्राचीन भारतीय वैभवशाली वारसा जगासमोर आला, तर इतर कलाकृती खूपच खुज्या ठरण्याच्या भीतीमुळे असेल कदाचित, असल्या आश्चर्यांपुढे अगदीच साध्या असलेल्या कुठल्यातरी संगमरवरी इमारतीला लोकांनी जागतिक आश्चर्याचा दर्जा दिला.

- शरद केळकर 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NUGZCW
Similar Posts
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव ३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!
पराशर तळे हिमाचल प्रदेशातील मंडीपासून उत्तरेला ५० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण, त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर, पराशर ऋषींचे मंदिर आणि पार्श्वभूमीवरचा हिमालय...
सुचिंद्रम मंदिरातील आश्चर्यकारक वैशिष्ट्याची मूर्ती कन्याकुमारी इथल्या १३०० वर्षांपूर्वी (!!!) बांधलेल्या सुचिंद्रम मंदिरातली, ग्रॅनाइटमधे घडवलेली ही एक मूर्ती...
श्री विष्णूंचा इंडोनेशियातील पुतळा : हिंदू देवतेचा जगातील सर्वांत उंच पुतळा हा फोटो आहे इंडोनेशिया देशातल्या बाली येथील, गरुडावर स्वार असलेल्या श्री विष्णूंच्या सोनेरी पुतळ्याचा!... इंडोनेशियन लोकांच्या भाषेत Garuda Wisnu Kencana Statue किंवा GWK Statue... (इंडोनेशियन भाषेत Kencana म्हणजे सोने, सोनेरी, सुवर्ण, Gold) १२२ मीटर (४०० फूट) उंच असलेला, कुठल्याही हिंदू देवतेचा,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language